प्रतिनिधी / म्हापसा
रायत मयडे येथील नागरिक तथा मयडे पंचायतीच्या माजी पंच सदस्य उर्मिला सदानंद राऊळ (वय 43) यांचे बुधवारी रात्री उशीरा गॉमेकॉत आकस्मिक निधन झाले. त्यांच्यावर गुरुवार दि.18 रोजी दुपारी मयडे स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे पती सदानंद यांनी मंत्रोग्नी दिली. त्यांच्या मागे 2 मुली, दिर, जू, पुतणे पुतणी असा परिवार आहे. विद्यमान पंच सदानंद राऊळ यांच्या त्या पत्नी होत.