ओटवणे / प्रतिनिधी:
बारावी परीक्षेत वाणिज्य शाखेतून सावंतवाडी तालुक्यात प्रथम क्रमांक पटकाविलेली माजगावची कन्या मयुरी संदीप कोटकर हिचा माजगाव यांच्यावतीने गौरव करण्यात आला. शिवसेनेचे माजगाव विभाग युवा सेना अध्यक्ष अतुल कासार यांच्याहस्ते मयुरी कोटकर हिचा सत्कार करण्यात आला. मयुरी कोटकर सावंवाडीतील राणी पार्वतीदेवी जुनियर कॉलेज वाणिज्य शाखेत बारावी मध्ये होती.यावेळी माजगाव सरपंच दिनेश सावंत, माजी सरपंच आबा सावंत, शिवसेना माजगाव विभाग प्रमुख संजय माजगावकर, माजगाव शिवसेना शाखा प्रमुख रुपेश नाटेकर, राकेश सावंत, जुबेर शहा, राजेश हरमलकर, रामचंद्र कुबल आदी उपस्थित होते.