डिचोली / प्रतिनिधी
मये मतदारसंघातील भाजप पक्षाचे उमेदवार प्रेमेंद्र शेट यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकारी उपजिल्हाधिकारी दिप वायंगणकर यांच्याकडे सादर केला. यावेळी त्यांच्या समवेत मंडळ अध्यक्ष दयानंद कारबोटकर, प्रभारी प्रेमानंद म्हांबरे, जिल्हा पंचायत सदस्य शंकर चोडणकर, महेश सावंत व इतरांची उपस्थिती होती.
मये मतदारसंघात गेल्या सलग तीन निवडणुकीत भाजपलाच मतदारांनी कौल दिला आहे. या निवडणुकीतही मयेतील जनता भाजपचा विजय साकार करण्यासाठी मतदान करणार. मयेतील सर्व पक्षाचे कार्यकर्ते आता एकवटले असून मयेत यावेळी पुन्हा कमळ फुलवून इतिहास घडविण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला आहे. असे यावेळी उमेदवार प्रेमेंद्र शेट यांनी सांगितले.