युवानेते अजय प्रभुगावकर करणार आज काँग्रेस प्रवेश
डिचोली/प्रतिनिधी
मये मतदारसंघात पिछाडीवर राहिलेल्या काँग्रेस पक्षाला येणाऱया निवडणुकीत नवीन चेहरा सापडला असून या मतदारसंघात काँग्रेसच्या अस्तित्वाला पुनर्जीवन प्राप्त होणार आहे. मतदारसंघातील युवानेते तथा पिळगाव येथील रहिवासी, समाजसेवक ऍड. अजय प्रभुगावकर शनिवार दि. 18 रोजी प्रवेश करणार आहेत. या मतदारसंघात ऍड. अजय प्रभुगावकर हेच काँग्रेस पक्षाचे संभाव्य उमेदवार ठरण्याची दाट शक्मयता आहे. त्यांनी मतदारसंघात आतापर्यंत केलेल्या कामामुळे ते प्रसिध्दीच्या झोतात आले असून त्यांच्या प्रवेशामुळे मयेत काँग्रेस पक्षाला चांगले दिवस येण्याची आशा आहे.
मतदारसंघात काँग्रेस पक्षाला आतापर्यंत खंबीर व सक्रिय नेतृत्व नसल्याने पक्षाचे कार्य अपेक्षेप्रमाणे पुढे जात नव्हते. मतदारसंघात काँग्रेसचे समर्थक, हितचिंतक व मतदारही मोठय़ा संख्येने आहे. मात्र या कार्यकर्त्यांना जागृत करून पक्षाच्या कार्याला गती मिळाली नव्हती. आता अजय प्रभुगावकर यांच्या स्वरूपात एक सक्रिय नेतृत्व लाभणार असून पक्षाच्या कार्याला वेग येणार आहे.
मये मतदारसंघात काँग्रेस पक्षाचे कार्य हाती घेतल्यानंतर या मतदारसंघातील सर्व ज्येष्ट-वरिष्ट तसेच निष्टवंत कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्यासाठी आपण तत्पर असणार. या मतदारसंघात काँग्रेस पक्षाला मोठा चाहतावर्ग आहे. या सर्वांपर्यंत पोहोचत एक प्रभावी फळी निर्माण करण्याचे ध्येय आहे. त्यादृष्टीने काम करताना सर्व बुथ समित्या निवडल्या आहेत. या मतदारसंघात काँग्रेस पक्षाला पुनर्जीवित करून येणाऱया विधानसभा निवडणुकीत पक्षाला विजयी करण्यासाठी आपले सर्वतोपरी प्रयत्न राहिल, असे त्यांनी या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.