जयसिंगपुर / प्रतिनिधी
कोरोना सारख्या महाभयंकर लॉकडाऊनमध्ये असून सूध्दा नामदार यड्रावकर फौंडेशन, यूवा फौंडेशन जयसिंगपूर, साई फिटनेस जीम जयसिंगपूर व सर्वांच्या सहकार्याने मरणासन अवस्थेत पडलेल्या माणसाला नविन जीवदान मिळाले आहे. सांगली कोल्हापुर रोडवर डिमार्ट जवळ खटावकर हॉस्पिटल शेजारी तसा नेहमीचा रहदारीचा आणि वर्दळीचा असून या रस्त्यावरून नेहमी शेकडो व हजारो लोक ये जा करतात. त्याच रस्त्याच्या कडेला खटावकर हॉस्पिटल शेजारी एक बेवारस इसम अनेक दिवस अन्न पाण्याविना एकाच ठिकाणी शेवटची घटका मोजत मरणाची वाट बघत पडत होता.
पण कुणीही त्याच्या जवळ जाऊन विचारपूस केली नाही.किंवा त्याला दवाखान्यात नेण्याची तसदी घेतली नाही पत्रकारांनी फोन वरून पोलीस कॉन्स्टेबल रोहित डावळे यांना कळवले. व त्यांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली. व त्याला पाणी व बिस्किट देण्यात आले.व त्याची परिस्थिती पाहून युवा फाउंडेशनचे (अध्यक्ष) अझहर पटेल , यांना फोनवरून कळवण्यात आले.त्यानंतर घटनास्थळी जाऊन साई फिटनेस जिमचे (अध्यक्ष) विनायक गायकवाड यांना कळविण्यात आले.ही बाब लक्षात आल्यानंतर त्या इसमा जवळ जाऊन त्याची विचारपूस केली.त्या इसमास जेवण पाणी देण्यात आले.यावेळी या बेवारस इसमाचे अंगावर कुजलेल्या अवस्थेत कपड़े होते. त्याच्या अंगावर चादर घालून आणि त्याची परिस्थिती पाहून लगेचच पोलिस स्टेशनला धाव घेत पोलिसांच्या मदतीने ॲम्बुलन्स मधून सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाऊन त्या इसमाला ऍडमिट करण्यास आले.
देव तारी त्याला कोण मारी या म्हणीचा प्रत्यय सर्वाना आला.सर्वांनी माणुसकीच्या नात्याने मदत करून माणुसकी जपली. सर्वांच्या सहकार्याने मरणासन्न अवस्थेत पडलेल्या माणसाला जीवनदान मात्र मिळाले आणि त्या इसमाला अजून कुठेतरी माणुसकी शिल्लक असल्याची भावना निर्माण झाली. त्याने सर्वांच्या कडे कृतज्ञता पूर्वक पाहून सर्वांचे आभार मानले.