राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
मराठा अभिवृद्धी निगम सरकारने स्थापन केले. याबद्दल आम्ही सरकारचे आभार मानत आहे. मात्र, आता मराठा अभिवृद्धी निगमला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव द्यावे, याचबरोबर राज्यातील इतर तालुक्मयांमध्ये सैनिक स्कूल सुरू करण्यात आली आहेत. त्याच धर्तीवर बेळगाव तालुक्मयातही सैनिक स्कूल सुरू करावे, या सैनिक स्कूलला राजषी छत्रपती शाहू महाराज यांचे नाव द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
राज्यामध्ये मराठा समाज मोठय़ा संख्येने आहे. मराठा समाजाच्या विकासासाठी अभिवृद्धी निगमची स्थापना करण्यात आली आहे. मात्र, मराठा समाज आणि संपूर्ण देशाचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव द्यावे, असे म्हटले आहे. याचबरोबर दरवषी किमान 1 हजार कोटी रुपये या निगमला राखीव ठेवावेत, जेणेकरून मराठा समाजातील आर्थिक दुर्बल घटकांना त्याचा फायदा होईल. तेव्हा या निवेदनाचा गांभीर्याने विचार करून सर्व मागण्या लागू कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
शिरस्तेदार मंजुनाथ जानकी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी पक्षाचे अध्यक्ष अमोल देसाई, दुर्गेश मेत्री, के. जी. पाटील, सुरेंद्र तळवार, नारायण बसरगी, कृष्णा कांबळे, संजय कोलकार, परशराम कांबळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.