प्रतिनिधी / सांगली
मुंबई येथील आझाद मैदान येथे सुरु असलेल्या मराठा समाजातील युवकांना महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या परिक्षेत पास झालेल्या युवकांना त्वरित नियुक्ती द्यावी यासाठी अंदोलन केले आहे. या आंदोलनाला सांगलीतून मराठा क्रांती मोर्चाचे डॉ. संजय पाटील नितीन चव्हाण यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी सहभाग घेत पाठिंबा दर्शवला आहे.
आंदोलनातील युवकांना संभाजी ब्रिगेड राष्ट्रीय संघटक दिग्विजय पाटील यांनी मार्गदर्शन केले यावेळी एम.जे.पाटील उपस्थित होते. मराठा आंदोलन कर्त्या युवकांच्या मागण्या समजून घेवुन सरकार दरबारी त्या त्वरित सोडवण्याचे आश्वासन खा. सुप्रिया सुळे यांनी यावेळी दिले.