मुंबई/प्रतिनिधी
मराठा आरक्षण कायदा सुप्रीम कोर्टाने रद्द केल्याने मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा समाज आरक्षणाच्या मागणीवर ठाम आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. मराठा समाजाच्या भावना जाणून घेण्यासाठी खासदार संभाजीराजेंनी महाराष्ट्राचा दौरा केला. आज त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. संभाजीराजे आणि शरद पवार यांच्यात १५ मिनिटं चर्चा झाली. बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना संभाजीराजे यांनी पवार यांच्याशी सकारात्मक चर्चा झाल्याचं सांगितलं. सर्व नेत्यांनी मराठा समजाला न्याय देण्याची भूमिका घेतली पाहिजे अशी मागणी यावेळी त्यांनी केली.
खासदार संभाजीराजे आणि खासदार शरद पवार यांच्या भेटीमध्ये मराठा आरक्षणावर सकारात्मक चर्चा झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान संभाजीराजे यांनी पवारांची भेट घेत मराठा आरक्षणाविषयी आपली भूमिका मंडली. यावेळी संभाजीराजे यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र यावं असं आवाहन त्यांनी केलं. तसेच मराठा समाजासाठी पवारांनी पुढाकार घ्यावा आणि मराठा समाजाला न्या द्यावा अशी मागणीही संभाजीराजे यांनी केली.
खासदार संभाजीराजे उद्या शुक्रवारी मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी राज्याचे मुख्यंमत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत.
दरम्यान, मराठा समाजाच्या आरक्षण मुद्दावर आज खासदार छत्रपती संभाजीराजे हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना मुंबईत भेटले. मुंबईत पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी आज सकाळी खासदर संभाजीराजे यांनी शरद पवार यांची भेट घेत मराठा आरक्षणावर चर्चा केली. मागील काही दिवसात सर्वोच्य न्यायालयाने मराठा आरक्षण फेटाळल्यानंतर रस्तावर उतरून मोर्चा, आंदोलन करण्याची भाषा काही मराठा संघटना करत आहेत. त्याचवेळी न्यायालय लढाई सरकार पातळीवर लढली जाणार आहे. या सर्व गोष्टीवर पवार आणि संभाजी राजे यांच्यात आज चर्चा झाली.