विनायक मेटेंचं निमंत्रण स्वीकारले
प्रतिनिधी / सातारा
शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी मराठा आरक्षण प्रश्नी साताऱ्यात जाऊन दोन्ही राजांची भेट घेतली. त्यांनी खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना 3 ऑक्टोबरला पुण्यात होणाऱ्या मराठा विचार मंथन बैठकीचे निमंत्रण दिले. दोन्ही राजेंनी मराठा समाजाच्या प्रश्नांवर विनायक मेटे यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली.
यावेळी दोन्ही राजेंनी या बैठकीला उपस्थितीचं आश्वासन दिलं आहे. तसेच मराठा आरक्षणासाठी दोघांचीही रणनीती ठरली आहे. या भेटीनंतर बोलत असताना विनायक मेटे म्हणाले, “मराठा आरक्षणाबाबत समाजामध्ये जो संभ्रम निर्माण झाला आहे. आरक्षणाबाबत दिशा ठरवण्यासाठी खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना मराठा विचारमंथन बैठकीचे निमंत्रण दिले. त्यांनी या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचे आश्वासन दिले आहे. यावेळी मराठा समाजाला या बैठकीत दिशा देण्याचे काम त्यांनी करावे अशी विनंती केल्यानंतर दोघांनी ही याबाबत संमती दर्शवल्याची माहिती मेटे यांनी दिली.