प्रतिनिधी/ बेळगाव
मराठा समाज आरक्षण अभियान समिती बेळगाव जिल्हा यांच्या पदाधिकाऱयांनी बेळगाव येथे आलेल्या भाजप ओबीसी मोर्चाचे राज्याध्यक्ष नरेंद्र बाबू यांची भेट घेऊन मराठा समाजाला 2 ए श्रेणीत समावेश करावे व याविषयी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदन स्वीकारून नरेंद्र बाबू यांनी या विषयावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. यावेळी मराठा समाज आरक्षण अभियान समिती बेळगाव जिल्हाध्यक्ष किरण जाधव, महादेव चौगुले, सुनील जाधव, गुणवंत पाटील, अजित यादव, रविकुमार कोकितकर, रमेश पाटील व राजन जाधव यांसह मराठा समाज आरक्षण अभियान समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.