श्री चषक क्रिकेट स्पर्धा
बेळगाव : श्री स्पोर्ट्स खडक गल्ली आयोजित श्री चषक निमंत्रितांच्या टेनिल बॉल क्रिकेट स्पर्धेत शनिवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यातून मराठा स्पोर्टस् ग्रामीण. अरोही स्पोर्टस, एस.जी स्पोर्टस, डी.बी. स्पोर्टस संघांनी विजय मिळवून पुढील फेरीत प्रवेश केला. संतोष सुळगे-पाटील, अश्विन कृष्णोजी, प्रवीण शिंदे, पवन शर्मा यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला. व्हॅक्सीन डेपो मैदानावर शनिवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात राज संघाने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 7 बाद 36 धावा केल्या. त्याला उत्तर देताना मराठा स्पोर्टस ग्रामीण संघाने 4.4 षटकात 3 बाद 39 धावा केल्या.
दुसऱया सामन्यात जगदंबा हंगरगा संघाने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 5 बाद 78 धावा केल्या. अरोही स्पोर्टस संघाने 7.5 षटकात 5 बाद 80 धावा करून सामना जिंकला.
तिसऱया सामन्यात बालाजी स्पोर्टस संघाने 8 षटकात 8 बाद 89 धावा केल्या. त्याला उत्तर देताना एस.जी. स्पोर्टस संघाने 7.2 षटकांत 6 गडी बाद 91 धावा करून सामना 4 गडय़ांनी जिंकला. चौथ्या सामन्यात डी.बी. संघाने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 5 बाद 88 धावा केल्या. त्याला उत्तर देताना ग्रामीण वॉरियर्स संघाला 8 षटकात 86 धावाच करता आल्या. हा सामना डी.बी. संघाने 2 धावांनी जिंकला.