प्रतिनिधी/ बेळगाव
मराठा कॉलनी, करिअप्पा कॉलनी, एस. व्ही. कॉलनी परिसरात कोरोना प्रतिबंधक लसीचे वितरण करण्यात आले. भरतेश होमोपॅथिक कॉलेज, डॉ. श्रीकांत कोकणे, डॉ. मिलिंद कुलकर्णी, डॉ. कविता बुगडी यांनी हा उपक्रम राबविला.
यावेळी माजी नगरसेवक बाळासाहेब काकतकर यांनी कोरोनाबद्दल माहिती दिली. त्याचबरोबर उपस्थितांचे स्वागत केले. जलाराम फौंडेशनचे अध्यक्ष कन्नुभाई ठक्कर यांनी फौंडेशनचा आढावा घेतला. यावेळी डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी हा डोस कशा पद्धतीने घ्यावा, याची संपूर्ण माहिती दिली.
याप्रसंगी मराठा बँक संचालक शेखर हंडे, जेठाभाई पटेल, चंद्र आहुजा, कोकीला ठक्कर, श्रीकांत देसाई, विजय पोरवाल, रमेश जैन, शिवाजी हंडे, संतोष सिंधानिया, बाळासाहेब गोडसे, महेश हणमशेठ, विनोद गोरडीया, मिलिंद ठक्कर, प्रकाश दोड्डण्णावर आदी उपस्थित होते. रमेश भंडारे यांनी आभार मानले.