प्रतिनिधी/बेळगाव
सुळगा (हिं.) येथील रहिवासी आणि कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे निवृत्त व्यवस्थापक एन. वाय. पाटील यांचे आज शनिवारी सकाळी अपघाती निधन झाले. बेळगाव – वेंगुर्ला मार्गावर चारचाकी वाहनाच्या धडकेने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांनी मराठा बँकेचे चेअरमनपदही भूषविले होते.