बेळगाव / प्रतिनिधी
मराठा को-ऑप. बँकेच्या मुख्य शाखेमध्ये मंगळवारी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती मोठय़ा उत्साहात साजरी करण्यात आली. प्रास्ताविक बँकेचे ज्येष्ठ संचालक बाळासाहेब काकतकर यांनी केले.
बँकेच्या उपाध्यक्षा नीना काकतकर व बाळाराम पाटील यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेणू किल्लेकर यांनी केले. यावेळी बँकेचे संचालक बाबुराव पाटील, शेखर हंडे, मोहन चौगुले, विनोद हंगिरगेकर, लक्ष्मण नाईक, जनरल मॅनेजर गजानन हिशोबकर, ब्रँच मॅनेजर संतोष धामणेकर व कर्मचारी उपस्थित होते.