प्रतिनिधी/ बेळगाव
बसवाण गल्ली येथील मराठा को-ऑप. बँकेच्या मुख्य शाखेमध्ये 343 वा शिवराज्याभिषेक दिन मोठय़ा उत्साहात शनिवारी साजरा करण्यात आला. यावेळी चेअरमन दिगंबर पवार यांच्या हस्ते शाखेमध्ये असलेल्या छत्रपती शिवरायांच्या तैलचित्राचे पूजन करण्यात आले. तसेच विलास लाड यांच्या हस्ते आरती करून ध्येयमंत्र म्हणण्यात आला.
प्रारंभी संचालक बाळासाहेब काकतकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले. तसेच शिवरायांच्या कार्याला उजाळा दिला. यावेळी विणा काकतकर, बाळाराम पाटील, लक्ष्मणराव होनगेकर, बी. एस. पाटील, रेणू किल्लेकर, मोहन चौगुले, लक्ष्मण नाईक, रविकिरण धुराजी आदींसह ग्राहक व कर्मचारी उपस्थित होते.