चेअरमन दिगंबर पाटील यांची माहिती : अ वर्ग सभासदांना 20 टक्के लाभांश देणार
प्रतिनिधी /बेळगाव
बसवाण गल्ली येथील मराठा को-ऑप. बँकेला सन 2020-21 या आर्थिक वर्षात 2 कोटी 55 लाख 19 हजार रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. बँकेकडे सध्या 148 कोटी 96 लाख रुपयांच्या ठेवी असून 102 कोटी 30 लाख रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. यावषी अ वर्ग सभासदांना 20 टक्के तर असोसिएट सभासदांना 6 टक्के लाभांश देण्याबाबत शिफारस करण्यात आल्याची माहिती चेअरमन दिगंबर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मराठा बँकेने आर्थिक क्षेत्रासोबतच आपली सामाजिक बांधिलकीही विविध उपक्रमांमधून जपली आहे. त्यामुळेच दरवषी सभासदांची संख्या वाढत आहे. 12 हजार 104 इतकी सभासदांची संख्या असून 2 कोटी 73 लाख 88 हजारांचे शेअर भांडवल आहे. 59 कोटी 24 लाख 48 हजार रुपयांचे रिझर्व्ह व इतर फंड आहेत. सभासदांच्या ठेवी सुरक्षिततेसाठी बँकेने 5 लाखापर्यंत विमा उतरविलेला आहे. ज्ये÷ नागरिकांना ठेवीवर अर्धा टक्का जादा व्याजदर देण्यात येत आहे. कर्ज व्यवहार वाढविण्याकरिता बॅंकेने कर्जाचे व्याजदर कमी केले आहे. गृहकर्ज 8.80 टक्के, वाहन कर्ज 9 टक्के, सामान्य कर्ज 10.50 टक्के याप्रमाणे कर्ज वितरण केले आहे. बँकेचा ग्रॉस एनपीए 4.39 तर नेट एनपीए शून्य टक्के असल्याचे व्हा. चेअरमन नीना काकतकर यांनी सांगितले.
बँकेने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ग्राहकांना जलदसेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. एटीएम, एसएमएस, इंटरनेट बँकिंग, नॅशनल पेमेंट कार्पोरेशन ऑफ इंडियामार्फत इमिडिएट पेमेंट सिस्टीम सुरू ठेवली आहे. मुख्य शाखेसोबतच मार्केट यार्ड, नरगुंदकर भावे चौक व खानापूर रोड या शाखेत बँकेचे स्वतःचे एटीएम आहे. वयाची 55 वर्षे व सभासद होऊन 20 वर्षे पूर्ण झालेल्या सभासदांना वृद्धापकालीन सभासद म्हणून 2500 रुपये सहकार्य निधी दिला जात असल्याची माहिती संचालक बाळासाहेब काकतकर यांनी दिली.
यावेळी ज्ये÷ संचालक बाळाराम पाटील, बाबुराव पाटील, लक्ष्मण होनगेकर, विश्वनाथ हंडे, विनोद हंगिरकर, मोहन चौगुले, सुशीलकुमार खोकाटे, रेणु किल्लेकर, सुनील अष्टेकर, लक्ष्मण नाईक यांच्यासह जनरल मॅनेजर गजानन हिशोबकर उपस्थित होते.