9 जागांसाठी झाली निवडणूक, बँकेसमोर गुलालाची उधळण
बेळगाव / प्रतिनिधी
शहरातील नामवंत मराठा सहकारी बँकेच्या संचालकमंडळाची निवडणूक रविवारी चुरशीने पार पडली. यावेळी 9 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी मतदारांनी गर्दी केली होती. सत्ताधारी पॅनल आणि अपक्षांमध्ये झालेल्या निवडणुकीत सत्ताधाऱयांनी आपली सत्ता कायम ठेवली. त्यामुळे सभासदांच्या विश्वासास सत्ताधारी सार्थ ठरले आहेत.
गेल्या 77 वर्षांपासून सेवा देणाऱया मराठा सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची मुदत संपु÷ात आली होती. 2020 ते 2025 या पंचवार्षिक मुदतीकरीता बँकेच्या संचालक मंडळाची निवड करण्यात आली. यापूर्वी 3 जागांवर बिनविरोध निवड झाली होती. उर्वरित 9 जागांसाठी निवडणूक रिंगणात 12 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यामुळे रविवारी मतदान पद्धतीने निवडणूक घेण्यात आली. मतदान प्रक्रियेला सकाळी 9 वा. बँकेच्या कार्यालयात प्रारंभ झाला. मतदान करण्यासाठी मतदारांनी सकाळपासूनच गर्दी केली होती. यावेळी 70 टक्के मतदान झाले. दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होती. 4 नंतर मतमोजणीस प्रारंभ झाला. यावेळी निवडणूक अधिकाऱयांनी जातीने लक्ष ठेवून मत मोजणीची प्रक्रिया पूर्ण केली.
बिनविरोध निवड झालेले उमेदवार
माजी उपमहापौर रेणु किल्लेकर, निना काकतकर, सुनिल अष्टेकर, सुशिल कोकाटे, लक्ष्मण नाईक आदींची बिनविरोध निवड झाली होती.
सत्ताधाऱयांच्या बाजूने सभासदांचा कौल
सामान्य गटातील 9 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत सत्ताधाऱयांमधील 9 जणांसह 3 अपक्ष उमेदवारांचा समावेश होता. पण सभासदांनी सत्ताधारी पॅनलच्या बाजूने कौल देवून अपक्षांना धक्का दिला. त्यामुळे पुंडलिक कदम-पाटील, मोहन बेळगुंदकर, दत्तात्रय नाकाडी यांना पराभव पत्करावा लागला. या मतमोजणी प्रक्रिये दरम्यान सर्वाधिक मतदान सत्ताधारी पॅनलमधील उमेदवारांना झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे सत्ताधारी पॅनलमधील बाळासाहेब काकतकर, मोहन चौगुले, दीपक दळवी, दिगंबर पवार, बाबुराव पाटील, बाळाराम पाटील, लक्ष्मण होनगेकर, विनोद हंगिरगेकर, विश्वनाथ हंडे या 9 उमेदवारांना भरघोस मतदान झाल्याने त्यांची संचालकपदी निवड झाल्याचे निवडणूक अधिकाऱयांनी घोषित केले.
बँकेसमोर गुलालाची उधळण
बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत सत्ताधाऱयांचीच सत्ता पुर्नप्रस्थापित झाली आहे. बँकेने आजपर्यंत दिलेल्या सेवा आणि नागरिकांची विश्वासार्हता कायम ठेवली आहे. त्यामुळेच या निवडणुकीत सत्ताधारी पॅनलने विरोधकांचा पराभव करून बॅंकेवर पुन्हा सत्ता प्रस्थापित केली आहे. यामुळे बँकेच्या कार्यालयासमोर फटाक्मयांची आतषबाजी करून गुलालाची उधळण करण्यात आली. सभासदांनी व समर्थकांनी जल्लोष केला.
विजयी उमेदवारांची तरुण भारत कार्यालयाला भेट
मराठा बँकेच्या संचालक मंडळावर निवड झाल्यानंतर सत्ताधारी पॅनलच्या विजयी उमेदवारांनी तरुण भारत कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी संस्थापक बाबुराव ठाकुर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.