प्रतिनिधी/ बेळगाव
शहरातील नामवंत मराठा सहकारी बँकेची संचालक मंडळाची निवडणूक रविवारी होणार आहे. या पार्श्वभूमीवर मराठा बँकेच्या सत्ताधारी पॅनेलचा प्रचाराच्या सांगता झाली. शनिवारी सत्ताधारी पॅनेलने उचगाव, मार्केट यार्ड, शिवाजीनगर, मुतगा, कुदेमानी, राकसकोप यासह चव्हाट गल्ली येथे घरोघरी जाऊन सर्व मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या.
यावेळी मतदारांचा भरघोस प्रतिसाद मिळाला
या स्पर्धेच्या युगात बँकेने एटीएम, आरजीएस, एनएफटी यासह डिजिटल बँकिंग सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तसेच बसवाण गल्ली येथील शाखेचे सुशोभिकरण करून अनेक सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून दिल्या आहेत. गेली 77 वर्षे बँकेने ही परंपरा जपली असून सभासदांचा विश्वास कायम ठेवला आहे. यावेळी सर्व सत्ताधारी पॅनेलमधील उमेदवारांना निवडून आणावे, असे आवाहन चेअरमन लक्ष्मण होनगेकर, व्हा. चेअरमन दिगंबर पवार यांनी केले आहे.
प्रचारादरम्यान सत्ताधारी पॅनेलमधील बाळासाहेब काकतकर, मोहन चौगुले, बाबुराव पाटील, बाळाराम पाटील, विनोद हंगिरकर, विश्वनाथ हंडे यासह माजी नगरसेवक यल्लाप्पा मोहिते, पुंडलिक परीट, देवेंद्र हावळ, शिवाजी किल्लेकर, किसन रेडेकर, विश्वास पवार, उत्तम नाकाडी, सदानंद पवार, राहुल आपटेकर, भाऊ नाईक, सुनील मेलगे, सागर शहापूरकर, जयवंत काकतीकर, चंद्रकांत मेलगे, सुनील पवार, सुनील पाटील, अरुण खांडेकर, संदीप मोहिते आदी उपस्थित होते.