► प्रतिनिधी/ बेळगाव
मराठा मंडळ पॉलीटेक्निक येथे अपघात नियंत्रण मोहीम राबविण्यात आली. यानिमित्त मार्केट पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक मल्लिकार्जुन तुळसीगेरी, उपनिरीक्षक विठ्ठल हावण्णावर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
अपघात कसे टाळावे, गुन्हेगारीपासून कसे दूर रहावे, मादक पदार्थांचे सेवन किती घातक आहे? याबाबत त्यांनी माहिती दिली. तसेच पोलीस हेल्पलाईनची मदत घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. यावेळी प्राचार्य आर. एस. सुर्यवंशी, सी. एस. देशपांडे, बी. आर. पावटे, ए. एम. पावशे, एस. एन. जाधव आदी उपस्थित होते.