बेळगाव : गेल्या रविवारपासून मराठा मंदिरच्या भव्य सभागृहात सुरू झालेल्या रेडिमेड गारमेंट्सच्या सेलला पहिल्या दोन दिवसात बेळगावकरांनी प्रचंड प्रतिसाद दिला.
कोरोना महामारीमुळे गेल्या वर्षभरात फॅक्टरीमध्ये तयार झालेला रेडिमेड गारमेंट्सचा स्टॉक तसाच राहिला. तो या सेलमध्ये आणण्यात आला असून अतिशय सवलतीच्या दरात विकला जात आहे. रेमंडस, पार्क अव्हेन्यू, पार्कस्, कलर प्लस, क्रोकोडाईल, आयझोड, ऍरो, पेपे जीन्स, एक्सकॅलिबर यासारख्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ब्रॅण्ड्सचे कपडे येथे उपलब्ध आहेत.
1499 ते 4999 दराचे जेन्टस शर्ट, टी शर्ट, पॅन्टस केवळ 599 ते 999 पर्यंत विकले जात आहेत. विविध प्रकारचे लेडीज, जेन्ट्स व किड्स शर्टस, टी-शर्ट, लोवर्स, बर्म्युडा, टॉप, केप्री, लेडीज पायजमा आणि कुर्तीस 150 ते 350 या दरात विकल्या जात आहेत. मल्टिब्रॅण्डेड गारमेंट्सचे विशेष काऊंटर असून तेथे 400 ते 699 दरात वेगवेगळय़ा प्रकारचे ब्रँड विकले जात आहेत. याशिवाय 200 ते 300 रुपये दराने बाजारात विकल्या जाणाऱया ब्रा, पॅन्टी येथे केवळ पन्नास रुपयात, विविध प्रकारच्या साडय़ा 150 ते 200 रुपयात आणि ब्रँडेड डिझायनर कुर्तीज 400 ते 500 रुपयात विकले जात आहेत. हे प्रदर्शन आणखी दोनच दिवस राहणार असल्याने ग्राहकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. आजवर मराठा मंदिरमध्ये लागलेल्या सेलमध्ये हा सर्वात भव्य सेल आहे, असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. कोविडच्या सर्व सूचनांचे पालन केले जात असून ग्राहकांनी मास्क घालूनच यावे, तसेच सोशल डिस्टन्सिंग पाळावे, असे आवाहन संचालकांनी केले आहे.