50 टक्क्यापर्यंत सवलत : 6 मार्चपर्यंत प्रदर्शन चालणार
प्रतिनिधी /बेळगाव
भारताच्या विविध प्रांतातील एकापेक्षा एक सुंदर अशा साडय़ांचे प्रदर्शन येथील मराठा मंदिरमध्ये भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनातील साडय़ा बेळगावकरांच्या पसंतीस निश्चित उतरतील, असा विश्वास आयोजक सौरभ गुप्ता यांनी व्यक्त केला.
मराठा मंदिर, गोवावेस येथे सिल्क इंडिया यांच्यावतीने आयोजित केलेल्या साडी प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी सायंकाळी झाले. या प्रदर्शनात खास बनारसी शालू तसेच देशाच्या विविध भागातून कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, बिहार, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, पश्चिम बंगाल, जम्मू-काश्मीर, राजस्थान, ओरिसा व तेलंगणा येथून आलेल्या सर्व प्रकारच्या फॅन्सी, सिल्क, सुती व पिंटेड साडय़ा आणि डेस मटेरियल ठेवण्यात आले आहे. याशिवाय बेडशिट्स, बेडकव्हर्स, पिलो कव्हर्स, मोत्याचे दागिने, काचेचे शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या फिरोजाबाद येथील बांगडय़ाही ठेवण्यात आल्या आहेत. दरात 50 टक्क्यापर्यंतची सवलत दिली जात असल्याने ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी आयोजक सौरभ गुप्ता आणि शबाना बानू यांनी उपस्थितांचे स्वागत केले. हे प्रदर्शन 25 फेब्रुवारी ते 6 मार्चपर्यंत चालणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. ‘देशाच्या विविध भागात आम्ही अशी प्रदर्शने आयोजित करीत असून बेळगावकरांकडून आम्हाला उत्तम प्रतिसाद मिळेल’ असे आयोजक म्हणाले. याप्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते.