संघाचे अध्यक्ष बाळासाहेब काकतकर यांची माहिती : विजेत्यांना भव्य बक्षिसे देऊन गौरविण्यात येणार
प्रतिनिधी / बेळगाव
सुवर्णमहोत्सवी मराठा युवक संघाच्यावतीने 54 व्या जिल्हा पातळीवरील शरीरसौ÷व स्पर्धा दि. 26 मार्च रोजी येथील मराठा मंदिरमध्ये आयोजित करण्याचा निर्णय नुकताच झालेल्या संघाच्या बैठकीत घेण्यात आला. ही बैठक सत्कार हॉटेलमध्ये झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मराठा युवक संघाचे अध्यक्ष बाळासाहेब काकतकर होते.
संघाच्या स्थापनेपासून ही स्पर्धा दरवषी आयोजित केली जाते. मात्र गतवषी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रद्द करण्यात आली होती. ही स्पर्धा स्पोर्ट्स ऍथोरिटी ऑफ इंडिया ने मान्यता दिलेल्या इंडियन बॉडी बिल्डर फेडरेशन (मुंबई) यांच्याशी संलग्न असलेल्या बेळगाव बॉडी बिल्डर असोसिएशन यांच्या नियमानुसार व सहकार्याने होणार आहे.
या स्पर्धेतील विजेत्यांना भव्य बक्षिसे देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच कै. ईश्वर सिद्दण्णावर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ अजित सिद्दण्णावर यांच्यावतीने रोलिंग ट्रॉफी देण्यात येणार आहे, अशी माहिती संघाचे सचिव चंद्रकांत गुंडकल यांनी दिली. याप्रसंगी संघाचे कार्याध्यक्ष रघुनाथ बांडगी, पदाधिकारी शिवाजीराव हंगिरकर, एल. एस. होनगेकर, दिगंबर पवार, शेखर हंडे, नारायण किटवाडकर सुहास किल्लेकर, अजित सिद्दण्णावर, एम. गंगाधर, सुनील गुरव, श्रीकांत देसाई आदी उपस्थित होते.