येळ्ळूर येथील सैनिक भवनमध्ये झाला कार्यक्रम : विविध उपक्रम राबविणार
प्रतिनिधी /येळ्ळूर
बारा मराठा लाईट इन्फंट्रीच्या माजी सैनिकांचा स्नेहमेळावा नुकताच पार पडला. येळ्ळूर येथील सैनिक भवन येथे हा स्नेहमेळावा झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी येळ्ळूर येथील सैनिक सोसायटीचे चेअरमन निवृत्त जवान बाबुराव मुरकुटे होते. प्रारंभी गणेश पूजन कॅप्टन कृष्णा मुचंडीकर, शिवप्रतिमा पूजन कॅप्टन परशराम डागेकर, दीपप्रज्वलन सुभेदार मेजर कृष्णा पाटील, लक्ष्मण मौन, कोटबागी, महेश पाटील, रामचंद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
कृष्णा मुचंडीकर यांनी स्नेहमेळाव्याचा उद्देश स्पष्ट करुन पुढील काळात संघटना मजबूत करुन विविध उपक्रम राबविणार असल्याचे सांगितले. ऍप्टन परशराम डागेकर यांनी सेवानिवृत्त झालेल्या जवानांना एकत्र करुन त्यांच्या समस्या सोडविणे याचबरोबर त्यांना मर्गादर्शन करणे महत्वाचे असल्याचे सांगितले.
प्रास्ताविक सैनिक सोसायटीचे व्हा. चेअरमन परशराम घाडी यांनी केले. निवृत्त जवानांसाठी गरुडा सेक्मयुरिटी तसेच आता नवीन वी डेल्टा फायू कंपनी काढत असून त्याचा लाभ निवृत्त जवानांनी घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. बाबुराव मुरकुटे म्हणाले, निवृत्त झाल्यानंतर येळ्ळूर परिसरात राबविण्यात आलेल्या विविध सामाजिक कार्याचा आढावा घेतला. सर्व माजी सैनिकांना एकत्र करुन सैनिक सोसायटी, सैनिक भवन उभारुन एक सर्वांसमोर आदर्श निर्माण केला आहे. कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता येळ्ळूरमधील माजी सैनिकांनी हे सामाजिक कार्य केले आहे, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाला विविध तालुक्मयातील माजी सैनिक उपस्थित होते. शेवटी मदन यलजी यांनी आभार मानले.