प्रत्येक चित्रपटाचे आपले नशीब असते असे म्हटले जाते. हेच नशीब त्याला कधी तिकीटबारीवर यश मिळवून देते. तर कधी चित्रपटमहोत्सवांच्या माध्यमातून चित्रपटाच्या जाणकारांच्या माध्यमातून पाठीवर कौतुकाची थाप मारते. काही चित्रपट मात्र याहीपेक्षा वेगळे यश मिळवत उत्तुंग भरारी घेत सर्वांसाठी प्रेरणादायी ठरतात. लेखक-दिग्दर्शक-अभिनेता दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘फत्तेशिकस्त’ हा गाजलेला मराठी चित्रपट भव्य-दिव्य यश मिळवल्यानंतर आता एक नवा इतिहास रचण्यासाठी सज्ज झाला आहे. हा चित्रपट आता मराठा लाईट इन्फन्ट्रीमध्ये संग्रहीत होणार असून, अशाप्रकारे संग्रहित होणारा हा पहिला चित्रपट ठरला आहे.
ए. ए. फिल्म्स यांच्या सहकार्याने आलमंड्स क्रिएशन्स प्रस्तुत, दिग्पाल लांजेकर यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला ‘फत्तेशिकस्त’ हा चित्रपट 15 नोव्हेंबर 2019 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. ‘फत्तेशिकस्त’च्या यशाची आजवर कधीही समोर न आलेली बाजू म्हणजे बेळगावमध्ये जवळपास 4 हजार भारतीय जवानांनी हा चित्रपट पाहिला होता. सैन्यदलाचे प्रशिक्षण घेणाऱया पॅडेट्ससोबतच सैन्यदलातील अधिकाऱयांनीही ‘फत्तेशिकस्त’चे कौतुक केले. हा चित्रपट त्यांना इतका भावला की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीचे दर्शन घडवणारा ‘फत्तेशिकस्त’ आपल्या आर्काइव्हमध्ये असावा असा निर्णय मराठा लाईट इन्फन्ट्री रेजिमेंटने घेतला आहे. मराठा लाईट इन्फन्ट्री हे भारतीय सेनेतील सैन्यदलातील सर्वात जुने सैन्यदल आहे. 1768 मध्ये स्थापन झालेल्या या सैन्यदलाची ओळख सुरुवातीला ब्रिटिश लष्करातील जंगी पलटण अशी होती. 1802 च्या सुमारास याला रेजिमेंटचा दर्जा देण्यात आला. बेळगावमध्ये असलेल्या या मराठा लाईट इन्फन्ट्रीच्या प्रशिक्षण केंद्रातील अर्काइव्हमध्ये ‘फत्तेशिकस्त’चा समावेश करण्यात येण्यामागे एक विशेष कारण आहे. ‘फत्तेशिकस्त’मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धनीती, शिवरायांच्या अष्टावधानी नेतफत्वाची, शौर्याची महती, त्यांच्या साथीदारांचा अजोड पराक्रम, गनिमी कावे, युद्धापूर्वीची शिस्तबद्ध तयारी, शत्रूची इत्तंभूत माहिती मिळवून त्याला कोंडीत पकडण्याची कला आणि सहकाऱयांच्या मदतीने गनिमावर विजय संपादन करण्याचा ध्यास या गोष्टींचे अत्यंत बारकाव्यानिशी सादरीकरण करण्यात आलेले आहे. मराठा लाईट इन्फन्ट्रीमध्ये सैनिकी प्रशिक्षण घेणाऱया प्रत्येक जवानाला छत्रपती शिवरायांची युद्धनीती प्रेरणा देणारी ठरणारी आहे. आजही जगभरातील बलाढय़ राष्ट्र ज्यांची नीती युद्धात वापरत आहेत त्या शिवरायांच्या युद्धनीतीचा अभ्यास मराठा बटालियनमधील सैनिकांना व्हावा या हेतूने मराठा लाईट इन्फन्ट्रीच्या अर्काइव्हमध्ये फत्तेशिकस्त समाविष्ट करण्यात येणार आहे.