प्रतिनिधी / बेळगाव
टिळकवाडी, स्वरुप प्लाझा येथील लिओ अभियंता सभागृहात मराठा जागृती निर्माण संघातर्फे अभियंता दिन साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी संघाचे प्रमुख गोपाळराव बिर्जे होते.
भारतरत्न एम. विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. अभियंते जयदीप बिर्जे, अश्विन दड्डीकर, अरुण सालगुडी, अश्विन उमनाबादीमठ यांना अभियंता दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी बीई विद्यार्थी प्रसाद चिकोर्डे, हर्षवर्धन नेसरीकर, सीए वनिता बिर्जे, विद्या डी. आर., विकास तारे, विरेश कागी, आकाश सप्रे, शुभम यलजी आदी उपस्थित होते. स्वागत अरुण सालगुडी यांनी केले तर आभार नम्रता बिर्जे यांनी मानले.