प्रतिनिधी/बांदा-
सावंतवाडी संस्थान मराठा समाज, मुंबई या संस्थेच्या वतीने सावंतवाडी व कुडाळ समित्या मार्फत मराठा युवक युवतीसाठी वधू वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार दिनांक 4 मे रोजी संस्थेच्या सावंतवाडी येथील सालईवाडा येथील टी.व्हि. देसाई वसतिगृहाच्या सभागृहात सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत आयोजन करण्यात आले आहे. हा वधू वर मेळावा कुडाळ, सावंतवाडी, वेंगुर्ला व दोडामार्ग तालुक्यातील फक्त कृषी क्षेत्र, व्यवसाय-उद्योग, नोकरी सेवा क्षेत्रात कार्य करणाऱ्या व यंदा कर्तव्य असलेल्या मराठा युवक युवती साठी आहे. तरी संबंधित युवक युवतींनी पालकासह मेळाव्याला उपस्थित राहून नोंदणी करावी असे आवाहन मेळावा निमंत्रक कृष्णाजी कोठावळे( 8308060880) यांनी केले आहे