प्रतिनिधी / बेळगाव
मनोहर बिर्जे हे मराठा समाज सुधारणा मंडळाचे धडाडीचे कार्यकर्ते होते. मंडळाची इमारत उभी करण्यासाठी त्यांनी मोलाचे सहकार्य केले. त्यांच्या निधनाने आपण एका किमयागारास मुकलो आहोत. अशा शब्दात बुधवारी मनोहर बिर्जे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. गेल्या 14 मार्च रोजी त्यांचे आकस्मिक निधन झाले. त्यांनी गेली अनेक वर्षे मराठा समाज सुधारणा मंडळाची मेलगे गल्ली येथील इमारत उभी राहण्यासाठी मोलाचे योगदान दिले होते. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मंडळाचे कार्यकर्ते व पदाधिकाऱयांची बैठक बुधवारी कार्यालयात झाली बैठकीच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष प्रकाश
मरगाळे होते.
प्रथम मनोहर बिर्जे यांच्या प्रतिमेचे पूजन मरगाळे यांच्या हस्ते झाल्यावर कार्याध्यक्ष शिवराज पाटील यांनी प्रास्ताविक केले.
याप्रसंगी मनोहर बिर्जे यांच्याबाबत सेपेटरी कॅप्टन जी. जी. कानडीकर, ईश्वर लगाडे ,एस. ओ. जाधव, रामभाऊ कुट्रे, अनंत लाड व प्रकाश मरगाळे यांची श्रद्धांजलीपर भाषणे झाली. याप्रसंगी राजीव पावले, मल्लाप्पा हिंडलगेकर, शितल वेसणे, सातेरी बेडरे व इतर सभासद उपस्थित होते के. एल. मजुकर यांनी आभार मानले
तरुण भारतचे विशेष कौतुक
तरुण भारतच्या दि. 17 मार्चच्या अंकात ‘मनोहर बिर्जे : रंगभूषेचा किमयागार हरपला’ या मथळय़ाखाली त्यांच्याबद्दल जी माहिती प्रसिद्ध झाली आहे त्याचे अनंत लाड व प्रकाश मरगाळे यांनी कौतुक केले. तरुण भारतमुळे बिर्जे यांच्यातील कलाकार जनतेला समजला. समाजातील अशा पडद्यामागे राहिलेल्या व प्रसिद्धीपासून दूर असलेल्या मान्यवरांची माहिती वृत्तपत्रांनी प्रसिद्ध करावी, असे मत त्यांनी व्यक्त केले.