प्रतिनिधी /फोंडा
गोवा मराठी अकादमीच्या फोंडा शाखेतर्फे आज मंगळवार 8 रोजी दहावीच्या परीक्षेत मराठी विषयात 90टक्के व त्याहून अधिक टक्के गुण मिळविलेल्या फोंडा तालुक्यातील विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. दुपारी 3.30 वा. शांतीनगर फोंडा येथील विद्यावृद्धी शाळेच्या सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून स्त्रीरोगतज्ञ डॉ. रेवा दुभाषी तर अध्यक्षस्थानी गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष प्राचार्य अनिल सामंत हे उपस्थित असतील. इन्स्टिटय़ूट मिनेझिस ब्रागांझाचे अध्यक्ष दशरथ परब व इतर मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत. विद्यार्थी व पालकांनी कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे फोंडा शाखेचे अध्यक्ष नितीन कोलवेकर यांनी कळविले आहे. अधिक माहितीसाठी प्रेमानंद नाईक 9423317840 यांच्याशी संपर्क साधावा.