प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव जिल्हा प्राथमिक शिक्षण समितीच्या टिळकवाडी येथील मराठी टीचर्स ट्रेनिंग महाविद्यालयात तरुण भारतचे संस्थापक कै. बाबुराव ठाकुर यांची जयंती साजरी करण्यात आली. बाबुराव ठाकुर यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्या एच. पी. परुळेकर यांनी केले. यावेळी कॉलेजचे लेखनिक एस. एस. नाझरे उपस्थित होते.