सावंतवाडी / प्रतिनिधी-
मराठी पत्रकार परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा आणि महाविकासआघाडी चे प्रणेत नामदार शरद पवार यांची भेट घेऊन पत्रकारांच्या विविध प्रश्नांकडे त्यांचे लक्ष वेधले यामध्ये त्यांनी पत्रकारांना फ्रंट वर्कर चा मान्यता देण्यात यावी ही प्रमुख मागणी केली मराठी पत्रकार परिषद, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, टीव्हीजेए आणि बीयुजे या संघटनांच्या एका शिष्टमंडळाने एस.एम.देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आज शरद पवार यांची त्यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी भेट घेऊन पत्रकारांना फ़न्टलाईन वर्कर म्हणून मान्यता मिळावी अशी मागणी केली.
राज्यात १४२ पत्रकार कोरोनाचे शिकार ठरले असताना देखील सरकार पत्रकारांच्या विषयाकडे पूर्णता दुर्लक्ष करीत असल्याची बाब ही शिष्टमंडळाने शरद पवार यांच्या निदर्शनास आणून दिली. पत्रकार पेन्शन, पत्रकारांवरील हल्ले, पत्रकार आरोग्य योजना, अधिस्वीकृती समितीचे पुनर्गठण, मुंबईतील पत्रकारांना लोकलमधून प़वास करण्याची सुविधा आदि विषय देखील शिष्टमंडळाने पवार यांच्या कानावर घातले आणि पत्रकारांच्या विविध प्रश्नांबाबत आपण लक्ष घालावे अशी विनंती त्यांना केली. “पत्रकारांच्या प्रश्नांबाबत आपण लक्ष घालू” असे आश्वासन शरद पवार यांनी शिष्टमंडळाला दिले.
शिष्टमंडळात एस.एम.देशमुख, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष मंदार पारकर, टीव्हीजेएचे अध्यक्ष विनोद जगदाळे, बीयुजेचे जॉइन्ट सेक्रेटरी सुरजसिंह ठाकूर, आदि सहभागी झाले होते. यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष शरद पाबळे दीपक कैतके उपस्थित होते.