घोडेबाजार रोखण्यासाठी सतर्क राहण्याचे ता. म. ए. समितीचे आवाहन
प्रतिनिधी/ बेळगाव
तालुका म. ए. समितीने आवाहन केल्यानुसार नुकताच झालेल्या ग्राम पंचायत निवडणुकीत समितीच्या व मराठी भाषिक उमेदवारांना समिती व मराठी भाषिक आणि इतर भाषिकांनी भरघोस मतांनी निवडून दिले आहे. तसेच निवडणुकीत उमेदवार निवड कमिटी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. याबद्दल तालुका म. ए. समितीच्या वतीने सर्वांचे जाहीर आभार व्यक्त करण्यात आले आहेत.
तसेच नवनिर्वाचित सदस्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे. नजिकच्या काळात ग्राम पंचायत अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर होणार आहे. यावेळी उमेदवारांची पळवापळवी व घोडेबाजार होण्याची शक्मयता आहे. त्यासाठी संबंधीत विभागातील उमेदवार निवड कमिटीने सतर्क राहून नियंत्रण ठेवावे असे आवाहन बेळगाव तालुका म. ए. समितीचे अध्यक्ष निंगोजीराव हुद्दार, कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर, सरचिटणीस एल. आय. पाटील यांनी केले आहे.