कन्नड तरुणांकडून खोटय़ा फिर्यादी दाखल
प्रतिनिधी / बेळगाव
मराठी भाषिकांना नाहक त्रास देण्यासाठी विविध पोलीस स्थानकांमध्ये खोटय़ा फिर्यादी दाखल करून घेण्याचा प्रकार वाढला आहे. खडेबाजारसह माळमारुती पोलीस स्थानकांमध्ये या फिर्यादी दाखल करण्यात आल्या आहेत. एकूण मराठी भाषिकांना टार्गेट बनविण्याचा प्रयत्न पोलिसांकडून होत असून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
कणबर्गी येथील बाबू इराप्पा जडगी या तरुणाने अंजनेयनगर येथील मराठी भाषिक असलेल्या शंभू साळके या तरुणाच्या विरोधात फिर्याद दिली आहे. कन्नड आणि मराठी द्वेषातून धमकी दिल्याचा आरोप या फिर्यादीत करण्यात आला आहे. याचबरोबर खडेबाजार पोलीस स्थानकामध्येही मराठी भाषिक तरुणांच्या विरोधात फिर्यादी दाखल करण्यात आल्या आहेत. यामुळे तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.