प्रतिनिधी /बेळगाव
विद्यार्थ्यांना परीक्षेचे बदललेले स्वरूप समजावे, एक तासात 40 गुणांची तयारी कशी करावी, यासाठी मराठी विद्यानिकेतन शाळेतर्फे दि. 6 ते मंगळवार 13 जुलैपर्यंत दररोज सकाळी 11 ते 12.30 पर्यंत एसएसएलसी व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे.
व्याख्यानमालेच्या पहिल्या दिवशी सीमाभागातील दहावीच्या जवळजवळ आठशे विद्यार्थ्यांचा सहभाग होता. मुख्याध्यापक इंद्रजीत मोरेंनी प्रास्ताविक केले. त्यानंतर दीपप्रज्वलन झाले. शाळेचे अध्यक्ष सुभाष ओऊळकर, उपाध्यक्ष आनंद जाधव, सदस्य नरसिंह पाटील, प्राध्यापक सुरेश पाटील उपस्थित होते. सुभाष ओऊळकर यांनी विद्यार्थी, पालक, शिक्षक व सर्व जनतेने याला सहकार्य करावे, असे आवाहन केले.
बेळगाव मराठी फोरमचे उपाध्यक्ष बी. एम. पाटील यांनी परीक्षेचे स्वरूप, मराठी विषयाचा संविधान तक्ता, पेपर कसा सोडवावा, व्याकरणाचा भाग, पद्यानुसार, गद्यानुसार कोणता महत्त्वाचा आहे, हे व्याख्यानमालेत स्पष्ट केले. सूत्रसंचालन सहशिक्षिका शीतल बडमंजी यांनी केले. शिक्षकवृंद कार्यक्रमासाठी उपस्थित होते. दि. 7 जुलै रोजी मार्गदर्शक एस. एस. लाड हे इंग्रजी विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.