वकील-शेतकऱयांचे महामार्ग प्राधिकरणाला निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
राष्ट्रीय महामार्गाचे सहापदरीकरण होणार आहे. त्याबाबत कन्नड आणि इंग्रजी माध्यमाच्या वृत्तपत्रांमधून नोटीस जाहीर करण्यात आली. मात्र बेळगावसह संपूर्ण सीमाभागामध्ये मराठी भाषिक तसेच इतर भाषिक मोठय़ा संख्येने राहतात. त्यामुळे नोटीस सर्वसामान्य शेतकऱयांना समजायची असेल तर मराठी वृत्तपत्रांमधून नोटीस जाहीर करणे गरजेचे आहे. तेक्हा मराठी वृत्तपत्रांतूनही नोटीस द्या, अशी मागणी वकील व शेतकऱयांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या साहाय्यक अधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे केली.
होनगा ते महाराष्ट्राच्या हद्दीपर्यंतच्या रस्त्याचे सहापदरीकरण करण्यात येणार आहे. त्याबाबत जमीन सर्व्हे केल्यानंतर तसेच जमिनी ताब्यात घेताना कन्नड व इंग्रजी दैनिकांमधून नोटीस देण्यात आली. आता शेतकऱयांना कागदपत्रे देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ती नोटीसही कन्नड व इंग्रजी माध्यमांतून दिली गेली आहे. त्यामुळे मराठी भाषिक शेतकऱयांना त्याबद्दल कोणतीच माहिती नाही. या राष्ट्रीय महामार्गामध्ये जमीन गेलेले शेतकरी हे 90 टक्क्मयांहून अधिक मराठी भाषिक आहेत. त्यांना या नोटिसीबद्दल कोणतीच माहिती नाही. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दहा दिवसांत आपली कागदपत्रे देण्याचे आवाहन केले आहे. मात्र शेतकऱयांना या नोटिसीबद्दल कल्पनाच नाही. तेव्हा आता दहा दिवसांऐवजी अधिक वेळ वाढवून द्यावा, अशी मागणीदेखील या निवेदनात करण्यात आली. ऍड. भैरु टक्केकर, ऍड. रमेश मोदगेकर, ऍड. शिल्पा देसाई, ऍड. युवराज होनमनी, ऍड. प्रमोद जाधव यांच्यासह वकील व शेतकरी उपस्थित होते.