वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
लक्झरी कार निर्मिती करणारी मर्सिडीज बेंझ कंपनीने गुगलसोबत दीर्घकालीन धोरणात्मक भागीदारीची घोषणा केली आहे. या भागीदारीमुळे त्यांचा नेव्हिगेशन अनुभव सुधारण्यास मोठी मदत होणार असल्याचे बोलले जात आहे.
मर्सिडीज कारमध्ये ठिकाणाच्या तपशीलासारखी नवीन वैशिष्ट्यो मिळतील. या भागीदारीसह, मर्सिडीज-बेंझ आपल्या ग्राहकांना गुगलच्या मदतीने संबंधीत ठिकाणांचा तपशील देऊ शकणार आहे. यामध्ये नवीन वैशिष्ट्यो देखील सादर करण्यात येणार असल्याची माहिती आहे. गुगल क्लाउडची कृत्रिम बुद्धिमत्ता, डाटा व ओपन इन्फ्रास्ट्रक्चर वापरुन सदरची माहिती मर्सिडीज-बेंझला प्राप्त करता येणार आहे.
नवीन सेवा देण्यास आम्हाला आनंद :सीईओ कैलेनियस
धोरणात्मक भागीदारीमुळे आम्ही आमच्या ग्राहकांना अनोखी सेवा देण्यासाठी व सुविधांचा स्तर उंचविण्यासाठी खूप उत्सुक असल्याचे बेंझचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओला कैलेनियस यांनी म्हटले आहे.