नवी दिल्ली : मर्सिडीज बेंझ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार वर्ष 2021 च्या पहिल्या तिमाहीत कंपनीने कार्सची विक्री मागील वर्षाच्या समान तिमाहीच्या तुलनेत 34 टक्क्यांनी अधिक केली असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यानच्या काळात 3,193 कार्सची विक्री कंपनीने केली आहे. विशेष म्हणजे चालू वर्षातील पहिल्या दोन महिन्यातही कंपनीच्या कार्सची समाधानकारक विक्री झाली आहे. सलग तिसऱया महिन्यातही कंपनीच्या विक्रीचा आलेख चढता राहिला आहे. जर्मन प्रीमियम कार निर्मिती कंपनीने वर्ष 2020 मधील जानेवारी ते मार्च या कालावधीत 2,386 कार्स विकल्या होत्या, अशी माहिती देण्यात आली.
Previous ArticleIPL वेळापत्रक २०२१
Next Article रेकॉर्डवरील दोघे जिल्हय़ातून हद्दपार
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.