मुंबई :
लक्झरी कार निर्मितीतील आघाडीवरची कंपनी मर्सीडिझ-बेंझ इंडिया येणाऱया काळात आपल्या ठराविक वाहनांच्या किंमती वाढवणार असल्याचे सांगण्यात येते. कार्सच्या किंमती कदाचित ऑक्टोबरपासून वाढणार आहेत, असे समजते. निर्मिती कार्यादरम्यान खर्चाचा भार वाढत असल्याची बाब कंपनीने स्पष्ट केली असून याचाच दबाव कंपनीवर जाणवतो आहे. यातून बाहेर पडण्यासाठी दरवाढ हाच उपाय असल्याचे कंपनीने म्हटले आहे. ‘मर्सीडिझ मी कनेक्ट’सारख्या नव्या तंत्रज्ञान, वैशिष्टय़ांसहच्या योजनेचे कंपनीने ग्राहकांसाठी सादरीकरण केले आहे. कंपनीच्या काही ठराविक कार्सच्या किंमती वाढवल्या जाणार असल्याचे सांगितले जाते. कंपनीने वाहन विक्री वाढावी यासाठी ग्राहकांना सुलभ वित्तयोजनाही सादर केली आहे.