नवी दिल्ली : जर्मनीस्थित मर्सीडीज बेंझने आपली नवी सुव्ह जीएलएस लक्झरी कार भारतीय बाजारात उतरवली आहे. दमदार इंजिन क्षमता व आकर्षक लुकसह अनेक वैशिष्टय़े या नव्या गाडीत समाविष्ट आहेत. पेट्रोल व डिझेलवर चालणाऱया गाडीची लांबी, रुंदी या खेपेस वाढवण्यात आली असून गाडीची दिल्लीतील एक्स शोरुम किंमत 99 लाख 90 हजार रुपये इतकी आहे.
केरळचा टाटावर भरवसा, 63 गाडय़ांची ऑर्डर
नवी दिल्ली : देशातील दिग्गज वाहन निर्माती कंपनी टाटा मोटर्सने वर्षाच्या सुरुवातीला नेक्सॉन इलेक्ट्रीक कार लाँच केली होती. भारतात कमी किंमतीत व चालवण्यास आरामदायी अशी ही कार अल्पावधीतच लोकप्रिय झाली. केरळमधील मोटर वाहन विभागाने नेक्सॉन इलेक्ट्रीकच्या 65 कार्स ऑर्डर केल्या आहेत. या अनुषंगाने पाहता इलेक्ट्रीक कार मागणी करणारे केरळ हे पहिले राज्य बनले आहे.
केरळने एक प्रकारे इलेक्ट्रीक कार्ससाठी टाटावर विश्वासच व्यक्त केला आहे. ही गाडी एक्स एम, एक्स झेड प्लस व एक्स झेड प्लस लक्स या प्रकारात मिळणार असून किंमत 13 लाख 99 हजारपर्यंत असणार आहे. एका चार्जवर ही गाडी 312 कि. मी. अंतरचे मायलेज देणार असल्याचेही कंपनीने म्हटले आहे.