प्रतिनिधी/ कराड
दोन दुचाकींचा किरकोळ अपघातात दुचाकी घसरून दुचाकीवरील दोघे किरकोळ जखमी झाले. मलकापूर येथील ढेबेवाडी फाटय़ावर ही घटना शनिवारी घडली. अपघातानंतर दोन्ही दुचाकीस्वारांमधे वादावादी होऊन गोंधळ उडाला. रस्त्यावरच उडालेल्या गोंधळाने गर्दी होऊन काहीसा तणाव निर्माण झाला. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर तणाव निवळला. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार युवकांसह तिघे दुचाकीवरून शिवछावा चौकाकडून आगाशिवनगरकडे जात होते. कराड-ढेबेवाडी रस्त्यावर येथील पवार मामा बझारसमोर दोन दुचाकींची किरकोळ घासाघीस होऊन ते पडले. दुचाकीवरील युवकांच्या पायाला किरकोळ जखमी झाली. यावेळी दोन्ही दुचास्वारांध्ये चांगलीच बाचाबाची झाली. युवकांनी जास्तच गोंधळ घातल्याने क्षणार्धात महिलांसह नागरीक घटनास्थळी गोळा झाल्याने गोंधळ वाढला. यावेळी झालेल्या गोधळामुळे परासरात कांहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत माहिती मिळताच पोलिस कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी हस्तक्षेप करून मध्यस्थी केल्यामुळे वातावरण शांत झाले. त्यानंतर पोलिसांनी किरकोळ जखमी युवकांना रिक्षाने उपचारासाठी वेणूताई चव्हाण उपजिल्हा रूग्णालयात पाठवून दिले. या घटनेची नोंद रात्री उशीरापर्यंत पोलिसात झाली नव्हती