प्रतिनिधी / शाहुवाडी
मोटर अपघात प्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्याचा 24 तासात निकाल देऊन आरोपी सिद्धू बसवांना ठणकेदार वय 27 राहणार करवाय्या तालुका उनची जिल्हा यादगीर कर्नाटक यास पाच हजार रुपये दंडाची शिक्षा शाहुवाडी मलकापूरच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर ए ए खतीब यांनी ठोठावली सरकारी अभियोक्ते ॲड. रणधीर येळवे यांनी केलेला साक्षी पुरावे तपास याबाबतचा युक्तिवाद ग्राह्य मानून दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली.
न्यायालयातून मिळालेल्या माहितीनुसार 3 जानेवारी रोजी अपघात प्रकरणी शाहूवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या घटनेचा तपास प्रभारी अधिकारी विजय पाटील पोलिस निरीक्षक शाहुवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार श्रीधर सावंत यांनी केला होता. या खटल्याची सुनावणी शाहुवाडी मलकापूर प्रथमवर्ग न्यायालयात करण्यात आली ५ जानेवारी रोजी आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. 24 तासात सदर आरोपीचे दोषारोपपत्र सिद्ध होऊन त्यांना विविध कलमाखाली पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली.या कामी सरकारी पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता रणधीर येळवे यांनी केलेला युक्तिवाद व साक्षीपुरावे या आधारे आरोपी सिद्धू बसवन्ना ठणकेदार यांना पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली.