प्रतिनिधी / शाहुवाडी
शिराळे तर्फ मलकापूर तालुका शाहूवाडी येथील वैभव श्रीपती पाटील वय 29 या युवकाने उजळाईवाडी येथे भाड्याने घेतलेल्या घरी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आत्महत्येचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार वैभव पाटील हा आपल्या पत्नीसह उजळाईवाडी येथे भाड्याच्या घरात राहत होता. तो औषध कंपनीत मार्केटिंग विभागात काम करत होता. शनिवारी सकाळी त्याने घराच्या छताला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली. त्याच्या पश्चात आई-वडील पत्नी असा परिवार आहे. शोकाकुल वातावरणात त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान सामाजिक उपक्रमात सतत अग्रेसर असणाऱ्या युवकांच्या आत्महत्येने परिसरात सर्वत्र शोककळा पसरली होती.