प्रतिनिधी / शाहुवाडी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक संचारबंदी चा अवलंब असतानादेखील त्याचे उल्लंघन करून विनापरवाना दारू वाहतूक करणाऱ्या जब्बार युसफ म्हालदार वय 51 राहणार गजापूर यांस मलकापूर विशाळगड मार्गावर मलकापूर येथे पकडून त्यांच्यावर शाहूवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे त्याच्या कडून कंमाडर गाडी सह एक लाख 87 हजार 480 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सपोनि भालचंद्र देशमुख यांनी केली कारवाई.
पोलिसांतून मिळालेल्या माहितीनुसार शाहूवाडी तालुक्यात संचार बंदीचा कडक अवलंब असताना देखील त्यांचे उल्लंघन करुन मलकापूर ते विशाळगड मार्गावर खाजगी कमांडर गाडीतून दारूची वाहतूक करत असलेल्या जब्बार म्हालदार यास मंगळवार पेठ मलकापूर येथे पकडून त्याच्याकडून गाडीसह एक लाख 87 हजार 480 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला याबाबतची फिर्याद पो कॉ सुयश रामचंद्र पाटील यांनी शाहुवाडी पोलिसात फिर्याद दिली . या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद्र देशमुख हे करत आहे.