शाहुवाडी/प्रतिनिधी
शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी या मागणीसाठी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शाहूवाडी तालुक्यातील शेतकर्यांच्या वतीने विठ्ठल मंदीर मलकापूर येथे रस्ता रोको करून चक्काजाम आंदोलन करण्यात आले तालुक्यातील विविध पक्षानी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिला संघटनेचे शाहुवाडी पन्हाळा विधानसभा संपर्कप्रमुख वसंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली चक्काजाम आंदोलन करण्यात आले.
स्वामीमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी या मागणीसाठी महावितरण कार्यालय कोल्हापूर येथे सुरू केलेल्या आंदोलनाचा आज शाहुवाडी तालुक्यातही चांगलाच परिणाम झालाशाहुवाडी तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष युवराज काटकर ‘ शेतकरी कामगार पक्षाचे राजेंद्र देशमाने आदींनी यावेळी पाठिंबा व्यक्त करून आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी बोलताना वसंत पाटील म्हणाले की शासनाने गांधारीची भूमिका घेतली आहे शेतकरी हा रात्रीच्या वेळी आपल्या जीवाची पर्वा न करता शेतीत राबत आहे मात्र शासन त्याची दखल घेत नाही शासनाला जाग येणे गरजेचे आहे यासाठी हा लढा अधिक तीव्र करणं हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे यासाठी या आंदोलनाला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी पाठिंबा देऊन हे आंदोलन अधिक तीव्र करावे असे आवाहन यावेळी केले
या चक्काजाम आंदोलनात पेरीडचे माजी सरपंच संजय पाटील, दादा यादव, भारत पाटील, रोहित जांभळे, बळी पाटील, पंडित केसरे, अमोल महाजन, भारतीय दलित महासंघाचे तालुकाध्यक्ष आकाश कांबळे आदी सहकरी उपस्थित होते.
दरम्यान आंदोलनस्थळी शाहूवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलजा पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस कॉन्स्टेबल सुयश पाटील, उल्हास हिरवे, अमर चव्हाण आदींनी चोख बंदोबस्त ठेवला होता.