प्रतिनिधी/शाहुवाडी
उचत पैकी लहिन गल्लीत कोरोना बाधित तीन रूग्ण आढळल्याने मलकापूर शहर या हाँटस्पाँट पासून जवळ असल्याने पालिका प्रशासन दक्षता घेतली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिका प्रशासनाने शहराचे पाच झोनमध्ये विभाजन केले आहे. हे प्रभाग पुर्णत: सील केले असल्याची माहिती मुख्याधिकारी शिला पाटील यांनी दिली.
लॉकडाऊन असताना ही शहरात नागरिकांचा सर्वत्र संचार सुरू होता. जिल्हाधिकार्यांनी शहरातील प्रभाग बंद करण्याचे आदेश दिल्यानुसार आज मलकापूर शहराचे पाच झोन मध्ये विभाजन करून प्रत्येक प्रभागात वैद्यकीय, औषधे, दूध, भाजीपाला व किराणा माल मिळेल अशी व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांना एका झोनमधून दुसर्या झोनमध्ये जाण्यास मनाई करण्यात आली आहे.
केवळ अत्यावाश्यक सेवेसाठी प्रत्येक प्रभागात प्रवेशमार्ग खुले ठेवले आहेत. प्रभागाच्या मुख्य प्रवेशाच्या ठिकाणी लोखंडी व लकडी बँरेकेडस, आदी साहित्यांने बंद करण्यात आले आहेत. या सर्व प्रभागाना जोडणारे रस्ते ही बंद करण्यात आले आहेत. झोनमधून ठरवून दिलेल्या तरूण मंडळ व स्वयंसेवकामार्फत प्रशासनाने बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे.