‘मूव्हिंग विथ मलायका’मधून होणार उघड होणार गुपितं
बॉलिवूडची ग्लॅमरस गर्ल मलायका अरोरा स्वतःच्या उत्तम नृत्यासाठी गॉर्जियस लुकसाठी ओळखली जाते. परंतु आता ती स्वतःच्या डिजिटल पदार्पणावरून चर्चेत आहे. मलायकाने डिस्ने प्लस हॉटस्टारसोबत स्वतःचे बहुप्रतीक्षित डिजिटल पदार्पण पेले आहे. याची पुष्टी मलायकाने दिली असून फर्स्ट लुक पोस्टरही शेअर पेले आहे.
मलायकाने स्वतःचा रियॅलिटी शो ‘मूव्हिंग विथ मलायका’संबंधी माहिती दिली आहे. या शोमध्ये ती चाहत्यांना स्वतःचा भूतकाळ, वर्तमान आणि भविष्यकाळाची एक झलक दाखवून देणार आहे. हा शो 5 डिसेंबरपासून पहायला मिळणार असून याची निर्मिती बानी जे एशियाकडून करण्यात आली आहे. या शोमध्ये तिचा मित्रपरिवार तसेच कुटुंबीयांना सामील होण्याची संधी मिळणार आहे. अभिनेत्रीशी निगडित अनेक गुपिते पहिल्यांदाच उघड होणार आहेत.
आजवर माझ्याबद्दल लोकांना केवळ सोशल मीडियाद्वारे जाणून घेता आले आहे. परंतु यावेळी मी स्वतःच्या आयुष्यातील किस्से उघड करण्यासाठी तयार आहे. या शोद्वारे मी माझ्या आणि चाहत्यांमधील अडथळे दूर करणार आहे. मूव्हिंग इन विथ मलायकाच्या माध्यमातून चाहत्यांना बरेच काही जाणून घेता येणार असल्याचे मलायकाने म्हटले आहे.