प्रतिनिधी/ म्हापसा
आपण राज्यात मंत्री म्हणून योग्य आहे की नाही हे सांगणारे लोकायुक्त कोण आहे? त्यांना हा अधिकार त्यांना कोणी दिला. मंत्रीपदी असताना आजवर माझ्यावर एकही तक्रार कोणी केली शिवाय आपण आपली डय़ुटी योग्यरीत्या बजावली नाही म्हणून आपल्याविरुद्ध कुणी तक्रारही लोकायुक्ताकडे केलेली नाही. असे कचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो यांनी कळंगूट येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हणाले.
लोकायुक्ताला बढती द्यावी की नाही वा नवीन लोकायुक्तची निवड करावी हा निर्णय मुख्यमंत्र्यांचा आहे. लोकायुक्तांना बढती देत नाही म्हणून आपल्यावर आरोप करीत मंत्रीपदास आपण योग्य नाही म्हणणे कितपत योग्य आहे. लोकायुक्तांनी आपल्या विरुद्ध बदनामकारण निवाडा दिला म्हणून मी गप्प बसणारा नाही. आपण न्याय देवतेचा आदर करतो. उच्च न्यायालयाने जे प्रकरण फेटाळले ते लोकायुक्तांनी उचलून धरून आपल्या विरुद्ध तक्रार करून आपण मंत्रीपदास योग्य नाही म्हणणे चुकीचे आहे. यामागे राजकीय हितशत्रूचा हात असल्याचा आरोपही यावेळी मंत्री मायकल लोबो यांनी केला.
अभ्यास न करताच लोकायुक्तांनी आदेश दिला
लॉकडाऊनपूर्वी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, कळंगूट कचरा प्रकल्पावर पाहणीसाठी आले होते. त्यांनी कळंगूट येथे अत्याधुनिक पद्धतीचा प्रकल्प आणल्याबद्दल अभिनंदन करून आपल्यास शाबासकी दिली होती. लोकायुक्त म्हणतात मी मंत्रीपदासाठी लायक नाही.
उच्च न्यायालयाने तक्रारदाराचा अर्ज दाखलही करून घेतला नाही. अँथोनी आर. डिसोझा तक्रार करतो व उच्च न्यायालय त्याला थेट आदेश देतो की तुमची तक्रार फेटाळण्यात आली. त्यानंतर ते लोकायुक्ताकडे धाव घेतात. जेवढे रस्ते आम्ही कांदोळी, साळगाव, हडफडे येथे केले आहे म्हापसा ते कळंगूट, काणका सर्कल दरम्यान रस्ते, सौंदर्यीकरण केले आहेत. काणका सर्कलजवळही पॅटीशन उच्च न्यायालयात घातले. काणका बांध येथेही रस्ता रुंदिकरण करणार तेही आता उच्च न्यायालय व लोकायुक्ताकडे जाणार आहे. हे कुणासाठी केले कोणत्या बिल्डरसाठी केले. काहींनी कुंपण बेकायदेशीर बांधले. मी सर्वसामान्य नागरिकांसाठी रस्ते बांधले.
काही सुडबुद्धीचे नागरिक स्वतःच्या फायद्यासाठी आपल्या विरुद्ध तक्रार देतात. लोकायुक्त पॅबिनमध्ये बसून तक्रारी घेतात व काही माहीत नसताना आदेश देतात असे मंत्री लोबो म्हणाले.
यामागे राजकीय रॅकेट दडलेले आहे
अँथोनी आर. डिसोझा यांनी उच्च न्यायालयात तक्रार दाखल करून घेतली आहे तर त्यांच्या भावजय रोझी डिसोझा लोकायुक्ताकडे तक्रार करीत आहे हे सर्वकाही रॅकेट आहे. या कोर्टमध्ये होत नाही तर भाऊ, बहीण, दुसऱया न्यायालयात जात आहे. हे आपल्यास मान्य नाही. या विरुद्ध आपण मुख्यमंत्र्यांकडे लेखी तक्रार करणार असून मुख्यमंत्री याची दखल घेत हे प्रकरण बाहेर टाकणार आहे असा आपला विश्वास आहे असे मंत्री मायकल लोबो म्हणाले.
पंचायतीकडे पत्र येते क्लार्क तेथे नजरचुकीने दोन नंबर इनवर्डला देतात याला एनजीपीडीएचा अध्यक्ष जबाबदार धरता येतो काय असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. सरकारला लोकायुक्त निवड करताना यापुढे विचार करावा लागेल.
बदनामीचा खटला दाखल करणार
आपल्या नावाची बदनामी करणाऱया रोझी डिसोझा, अँथोनी डिसोझा तसेच लोकायुक्त यांच्या विरुद्ध आपण बदनामीचा खटला दाखल करणार असल्याचे मंत्री मायकल लोबो म्हणाले. लोकायुक्ताने 21 तक्रारीचा आदेश दिला त्या सर्व चुकीच्या आहे असे मंत्र्यांना विचारले असता त्याबाबत आपण काही बोलू शकत नाही ते काम मुख्यमंत्र्यांचे आहे असे मंत्री लोबो म्हणाले.