ऑनलाईन टीम / पुणे :
दरवेळी तुमच्या मुलाने हे ट्विट केले, असे मला विचारले जाते. पण मला काही तेवढाच उद्योग नाही. राज्यातील अनेक जबाबदाऱ्या माझ्याकडे आहेत, अशी प्रतिक्रिया उपुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
पुण्यात अजित पवार यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर माध्यमांशी बोलताना अजित पवार यांना पार्थ पवार यांच्या मराठा आरक्षणावरील ट्विट बद्दल विचारले असता त्यांनी आपली भूमिका मांडली.
अजित पवार म्हणाले, जो तो स्वतंत्र विचारांचा असतो, प्रत्येकाला काय ट्विट करावं याचा अधिकार असतो. पार्थने जे ट्विट केले त्यावर माझी बहिण सुप्रिया सुळे यांनी आमची भूमिका स्पष्ट केली आहे. तुमची मुले काय ट्विट करतात हे तुम्ही पाहता किंवा विचारता का? असा सवाल ही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
दरम्यान, बीडमधील विवेक रहाडे या विद्यार्थ्याच्या आत्महत्येनंतर, मराठा आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल करणार असल्याचे पार्थ पवार यांनी ट्विट करत सांगितले होते.