रुग्ण सापडलेल्या भागात सर्वेक्षण सुरू
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
सिंधुदुर्ग जिल्हय़ात हिवताप (मलेरिया) रुग्णांमध्ये वाढ होऊ लागली आहे. नोव्हेंबरअखेर जिल्हय़ात 32 हिवतापाचे रुग्ण आढळले आहेत. यामुळे जिल्हा हिवताप विभाग सतर्क झाला असून रुग्ण आढळलेल्या भागात सर्वेक्षणाचे व रक्त नमुने घेण्याचे काम हाती घेण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा हिवताप अधिकारी रमेश कर्तस्कर यांनी दिली.
दोडामार्ग तालुक्मयात नव्याने मलेरियाचे चार रुग्ण आढळले आहेत. तर, आतापर्यंत जिल्हय़ात 32 रुग्ण सापडले आहेत. गतवषीच्या तुलनेत यावषी हिवतापाचे अधिक रुग्ण सापडले आहेत. गतवषी नोव्हेंबरअखेर 22 रुग्ण सापडले होते तर चालू वषी नोव्हेंबरअखेर 32 हिवतापाचे रुग्ण सापडले आहेत. यामध्ये वैभववाडी तालुक्मयात 1, देवगड 2, कणकवली 6, मालवण 3, कुडाळ 6, वेंगुर्ला 2, सावंतवाडी 8 तर दोडामार्गमध्ये नव्याने 4 रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे जिल्हय़ाचा हिवताप विभाग सतर्क करण्यात आला आहे. हिवताप विभागाच्या कर्मचाऱयांच्या माध्यमातून रुग्ण सापडलेल्या गावांमध्ये तात्काळ सर्वेक्षण सुरू केले असून रक्त नमुने गोळा केले जात आहेत. जिल्हय़ातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर जिल्हय़ाच्या सर्व सीमा खुल्या केल्याने जिल्हय़ात विविध क्षेत्रात काम करणारे परजिल्हय़ातील कामगार मोठय़ा संख्येने दाखल झाले आहेत. यामुळे हिवतापाच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. या कामगारांमध्ये हिवतापाचे रुग्ण अधिक आढळले आहेत. आतापर्यंत मिळालेले रुग्ण हे परजिल्हय़ातील कामगारच असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे जिल्हय़ाबाहेरून येणारे बांधकाम क्षेत्रातील कामगार, ऊस तोडकाम करणारे कामगार, यांना केंद्रबिंदू धरून जिल्हय़ात सर्वेक्षणाचे काम हाती घेतले आहे. हिवतापाच्या रुग्णांचा जलदगतीने शोध घेणे आणि त्यांना उपचाराखाली आणण्यासाठी जिल्हा हिवताप विभाग सतर्क झाला आहे, अशी माहिती जिल्हा हिवताप अधिकारी रमेश कर्तस्कर यांनी दिली.