कौलालंपूर –
मलेशियाच्या पंतप्रधानपदी इस्माइल सब्री याकोब यांची नव्याने निवड करण्यात आली असल्याची माहिती मलेशियाचे राजे अल-सुल्तान अब्दुल्लाह यांनी दिली आहे.
गेल्या तीन वर्षात पंतप्रधानपदी विराजमान होणारे इस्माइल याकोब हे तिसरे पंतप्रधान आहेत. याआधी या पदावर मुहीयुद्दीन यासीन हे कार्यरत होते. 17 महिन्यांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर मुहीयुद्दीन यांनी आपल्या पदाचा नुकताच राजीनामा दिला. संसदेत विश्वासदर्शक ठराव न जिंकल्याने त्यांना राजीनामा द्यावा लागला. नवनियुक्त पंतप्रधान इस्माइल याकोब हे आधीच्या सरकारमध्ये उपपंतप्रधान पद सांभाळत होते. युनायटेड मलेशिया नॅशनल ऑर्गनायझेशन
( युएमएनओ) या आघाडीच्या पक्षाने 60 वर्षे मलेशियावर राज्य केले होते. पण 2018 मध्ये सार्वत्रिक निवडणूकीत पक्षाला पराभव पत्करावा लागला होता. नंतर 2020 मध्ये पुन्हा पक्षाची सत्ता आली आणि मुहीद्दीन यांना पंतप्रधानपद मिळालं होतं.