गुंतवणूकदारांना अधिक नफा कमाविण्याची संधी : वर्षभरात 86 टक्क्यांपर्यंत परतावा
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
देशामध्ये म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक करण्याकडे गुंतवणूकदारांचा कल वाढत असल्याचे पहावयास मिळत आहे. यामध्ये गुंतवणुकीसाठी नवीन प्लॅन करावयाचा असल्यास म्युच्युअल फंड्सच्या मल्टीकॅप फंडमध्ये गुंतवणूक करण्याची सुवर्ण संधी निर्माण होत असल्याचे संकेत असून मागील वर्षभरात मल्टीकॅप फंड्सने जवळपास 86 टक्क्यांपर्यंत परतावा दिला असल्याची माहिती दिली आहे.
मल्टी कॅप फंड्सच्या अंतर्गत लार्जकॅप, मिडकॅप आणि स्मॉलकॅप या वर्गात गुंतवणूक केली जाते. वरील तीन वर्गवारीत स्वतःच्या जोखमीवर खरेदी केली जाते. सेबीच्या नियमावलीनुसार भांडवली बाजारात प्रमुख 100 कंपन्या लार्ज कॅपमध्ये कार्यरत असून त्यानंतर मिडकॅप व स्मॉलकॅप कंपन्यांचा समावेश होत असल्याची माहिती आहे. मल्टीकॅप फंडमध्ये लॉर्जकॅप, मिडकॅप आणि स्मॉलकॅप या तीन वर्गाचा 25-25 टक्क्यांपर्यंत हिस्सा ठेवावा लागतो. फंड मॅनेजरला कमीत कमी 75 टक्के इक्विटी आणि इक्विटी ओरिएंटेड फंडमध्ये गुंतवणूक करावी लागणार असल्याचे संकेत आहेत.
मागील वर्षभरातील मल्टीकॅप फंड्सचा परतावा
- फंडचे नाव………………. वर्षभरातील मागील 3 वर्ष मागील 5 वर्ष क्वांट ऍक्टिव्ह फंड 86.2 29.1 23.8…………………………… महिंद्रा वाढ योजना……. 76.4 23.6 19.5
- बडोदा पायोनियर ग्रोथ फंड…………. 71.1……… 18.6 15.0
- इनवेस्को इंडिया मल्टीकॅप ………….. 68.7……… 17.1 16.7
- आयसीआयसीआय प्रुडेंशियल 65.0 13.9 14.3